Sunday, 22 April 2012

Great Thoughts.... Sundar Tatwe....// Einstein //


by Sourabh Bhunje on Thursday, April 19, 2012 


Chetan Khairnar => स्वच्छंदी जगणे !(swachandi jagne)

 • आईन्स्टाईनला सगळं जग ओळखतं. पण आईन्स्टाईनसारखा अत्यंत बुद्धिमान माणूस तत्त्वज्ञानाच्य ा दहा जीवनमूल्यांवर जगला. त्यातूनच तो आईन्स्टाईन होऊ शकला. काय होती त्याची जीवनमूल्यं...?

  आईन्स्टाईन म्हणतो,

  - माझ्याकडे खास अशी बुद्धिमत्ता नाही. पण मला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचं कुतुहल वाटतं.

  - मी कणखर वगैरे नव्हतोच कधी, माझ्या आयुष्यातल्या चिवट अडचणींनी, प्रश्नांनी मला तसं घडवलं.

  - मी एकावेळेस दोन कामं करूच शकत नाही, हे मला माहिती आहे. म्हणून मी आत्ता महत्त्वाचं काम काय ते ओळखून आधी ते करतो.

  - ज्ञानापेक्षा कल्पकता महत्त्वाची वाटते मला. कारणती कल्पनाशक्ती मला जगण्याचं बळ देते.

  - चुका हा माझ्या जीवनाचा भाग आहेत. कारण मी काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतो म्हणून चुका घडतात.

  - भविष्य फार पटकन समोर येतं. त्यामुळे त्याचा विचार मी करत नाही. मी आत्ताचा वर्तमान जगतो, कारण तो परत येत नाही.

  - यश हे क्षणिक असतं. माझ्याकामाने जर इतरांना फायदा होणार असेल तरच ते दीर्घकाळटिकतं, असं मला वाटतं.

  - मी एकच गोष्ट एकाच पद्धतीने पुन:पुन्हा करत नाही. कारण त्यातून मला नवे निष्कर्ष सापडत नाहीत.

  - एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती हे माझं ज्ञान आहे, असं मला वाटत नाही. ज्ञान हाअनुभवातून शिकण्याचा विषय आहे, असं मला वाटतं.

आईन्स्टाईन

1 comment: